मुंबई । पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतान ऑपरेश सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, शंभर पेक्षा दहशतवादी ठार झाले. यांनतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला, त्यानंतर अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली. ऑपरेश सिंदूरनंतर भाजपच्या वतीनं देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे, परंतु यावर प्रश्न उपस्थित करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मोदीजी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे की प्रचारमध्ये?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
‘दरम्यान अजून त्या महिलांना न्याय मिळालेला नाही, ज्यांच्या पतींची पहलगाम हल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली, एक महिना झाला, या हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? आणि तुम्ही उत्सव साजरा करत आहात?’ असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे, ‘युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा, युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्यात अशी विनंती अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार देखील मानले आहेत. मात्र आता या पत्रामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
Discussion about this post