मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्याच्या गोट्यातून एक मोठी बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी काडीमोड घेत स्वतंत्र लढण्याची घोषणा आज प्रकाश आंबडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले.
आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटालाही धक्का दिला आहे.
लोकसभा मतदार संघ उमेदवारांची नावे
रामटेक आजच उमेदवाराची घोषणा
भंडारा-गोंदिया – संजय केवट
गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलडाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – कु. प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार















Discussion about this post