मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात लागणार आहे. जस जशा या निवडणुका जवळ येत आहे तस-तसे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. असं असताना आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठी राजकीय ऑफर दिली आहे.
काय आहे ऑफर?
अजित पवार तुम्ही महायुतीतून बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करु, अशी ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी देवून टाकली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके फुटतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत, असं म्हणत आहे. वंचितकडे जातो असं सांगत आहेत. आम्हाला थांबवायचं असेल तर सीट वाढवा असं सांगत आहे. अजित पवार यांनी बाहेर पडावं. त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो”, अशी ऑफरच प्रकाश आंबेडकर यांनी देवून टाकली आहे.
अजित पवार गटाने ही ऑफर स्वीकारली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं राजकीय समीकरण निर्माण होऊ शकतं. पण हे कितपत शक्य आहे? ते आगामी काळात स्पष्ट होईल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या ऑफरवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Discussion about this post