राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद पेटला असून यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानामुळे वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या विधानाची चर्चा सध्या सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या प्रचारात भाजप ‘औरंगजेबाची कबर’हा राजकीय मुद्या कसा कसा करणार याबाबत आंबेडकरांनी सांगितले आहे.
आपल्या ट्विटमध्ये औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार आहे, असं आंबेडकरांनी म्हटलंय आहे. भाजपा आणि आरएसएसला त्यांनी निशाणा साधला आहे.
‘ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. 2026 साली होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत. होय तुम्ही खरं वाचलंय. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार आहे. 2026 साली निवडणूक होणार आहे,’ असे आंबेडकरांनी म्हटलं आहे.
Discussion about this post