जळगाव । राज्यातील विधानसभा निवडणुकांना अद्याप दोन ते महिन्याचा कालावधी आहे. मात्र त्यापूर्वी राज्यातील सर्वच पक्षाकडून जोरदार सुरु करण्यात आलीय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि रावेर या विधानसभा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्ष उमेदवार देणार आहे.
रावेरमधून पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी हे स्वतः उमेदवारी करतील, तर भुसावळसाठी लवकरच उमेदवार जाहीर होईल. जळगाव मतदार संघासाठी चाचपणी सुरु असून चांगला उमेदवार मिळाल्यास येथेही उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, महाप्तगर अध्यक्ष प्रवीण पाटील, राजेंद्र कुंवर, युवक तालुकाध्यक्ष सतीश सपकाळे, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश सूर्यवंशी उपस्थित होते. पुढे बोलतांना सोनवणे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षाची रावेर मतदार संघासाठी गेल्या ५ वर्षांपासून तयारी सुरु आहे. याठिकाणी बुध रचना देखील तयार झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ९ ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे शेतकरी, दिव्यांग, महिला, तरुण, वृद्धांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलनाला दीड लाख समर्थकांची उपस्थिती राहणार असून जळगावमधून ३ हजार समर्थक सहभागी होणार आहेत















Discussion about this post