Saturday, February 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दी सह योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा

मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त अ.रा. पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 2, 2024
in जळगाव जिल्हा, सरकारी योजना
0
प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दी सह योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
बातमी शेअर करा..!

जळगाव | प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दी सह योजना (PM- MKSSY) ही प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमधील केंद्रीय क्षेत्र अंतर्गत सह योजना आहे. ही योजना सन २०२३-२४ ते सन २०२६-२७ या ४ वर्षा करता केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रथम टप्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी निगडीत लाभार्थ्यांनी National Fisheries Digital Platform (NFDP) अंतर्गत नोंदणी करायची आहे. यासाठी मच्छीमारांनी तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी निगडित कामगार, मत्स्यविक्रेते, मत्स्यसंवर्धक, बीजनिर्मिते व्यापारी, मत्स्यखाद्य उत्पादक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जवळच्या सामाईक सेवा केंद्र (Common Service Centre CSC) येथे जावुन आपली नोंदणी Inland Fisheries मध्ये करुन घ्यायची आहे. या नोंदणीसाठी चालु स्थितीतील बँक खाते, आधार कार्ड, आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड हे आवश्यक राहणार आहे.

या योजने अंतर्गत मत्स्यपालन / मत्स्यसंवर्धन प्रकल्पांना योग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ४ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जलक्षेत्रासाठी विमा खरेदी करु इच्छिणा-या संवर्धकांना एकवेळ प्रोत्साहन (One Time Incentive) देण्याची तरतुद या योजनेत असून सदर प्रोत्साहन रक्कम प्रकल्पाच्या जलक्षेत्रासाठी रु. २५०००/- प्रति हेक्टर मर्यादेच्या अधिन असलेल्या प्रिमीयम खर्चाच्या ४०% इतकी असणार आहे. सदर देय कमाल प्रोत्साहन रकमेची मर्यादा एक लाख रुपये मात्र व कमाल मत्स्यसंवर्धन क्षेत्र आकार ४ हेक्टर जलक्षेत्र इतके असणार आहे. या व्यतिरिक्त केजकल्चर, रि-सरक्र्क्युलेटरी अॅक्वाकल्चर सिस्टीम (RAS), बॉयोफलॉक, रेसवे या सारख्या प्रकल्पाच्या बाबतीत देय प्रिमियमच्या ४०% इतके प्रोत्साहन (One Time Incentive) दिले जाईल. याबाबतीत कमाल प्रोत्साहन रक्कम रुपये १ लाख व प्रकल्पाचा कमाल युनिट आकार १८०० घन. मी. असेल. SC/ST व महिला लाभार्थ्यांसाठी सामान्य श्रेणी देय असलेल्या प्रात्साहनाच्या १०% अतिरीक्त प्रोत्साहन दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दी सह योजनेच्या लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी NFDP अंतर्गत नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. या योजनेच्या अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), मंडोरे बिल्डींग, दुसरा मजला, डॉ. आंबेडकर मार्केटजवळ, जळगांव या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त अ.रा. पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आता नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल अ‍ॅप

Next Post

संरक्षण मंत्रालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती; 92300 पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
संरक्षण मंत्रालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती; 92300 पगार मिळेल

संरक्षण मंत्रालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्समध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती; 92300 पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्ध पेटलं ! इस्राइलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आणीबाणीची घोषणा

युद्ध पेटलं ! इस्राइलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आणीबाणीची घोषणा

February 28, 2026
पाळधी ते तरसोद महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची एकमेकांवर धडक

पाळधी ते तरसोद महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची एकमेकांवर धडक

February 28, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

February 28, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला झटका ; ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात दिला हा महत्त्वाचा निकाल

February 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page