मुंबई । अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेला मरणाचं ढोंग महागात पडणार आहे. काही दिवसापूर्वी सर्वायकल कॅन्सरने निधन झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अशातच दुसऱ्या दिवशी आपण जिवंत आहोत असं म्हणत तिने एक व्हिडीओ शेअर केला.
मात्र मृत्यूची खोटी बातमी पसरवल्यामुळे आता पूनम पांडेला अटक होऊ शकते, मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याने महाराष्ट्राच्या MLA सदस्यांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
24 तासांत लेखी माफीनामा सादर करावा, अन्यथा कामबंद आंदोलन करू अशी वेस्टर्न इंडिया सिनेकामगार संघटनेची मागणी आहे. अन्यथा पूनम पांडेचा सहभाग असलेल्या कुठल्याही शूटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पूनमने आपला कॅन्सने मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती.
Discussion about this post