जालना : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान, त्यांनी जालन्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला थेट इशारा दिला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आडून विधानसभेचं राजकारण सुरु आहे. ही बाब समोर यायला पाहिजे. शरद पवार यांच्या सारखे अनुभवी व्यक्ती महाराष्ट्रात मणिपूर होईल,असं वक्तव्य केले जात आहे.’शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात पुढील तीन महिन्यात दंगली घडवायच्या आहेत. शरद पवारांचं राजकारण पाहिल्यास समजून येईल. दुसऱ्या जातीविषयी द्वेष निर्माण करणं, हे पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केल्यानंतर सुरु झालं, असा आरोप ठाकरेंनी केला.
‘माझ्या नादी कोणी लागू नये. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत. तर माझ्याकडे विस्थापित आहेत. समजात द्वेष निर्माण करून कशाप्रकारचे राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचा विरोध असेल तर त्याविषयी बोला. पण समाजात कशाला तेढ निर्माण करता, असे राज ठाकरे म्हणाले. ‘शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत शब्द का टाकला नाही? जरांगे पाटलांच्या मागे राहून राजकारण कृज्ञतापूर्वक आहेत. माझे पोरं काय करतील सांगता येत नाही, घरात जाऊन गाल आणि पाठ पाहावी लागेल. अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले.















Discussion about this post