मुंबई | कॉंग्रेस न होती तो क्या होता ? या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यावर भाष्य केलं. मी पुन्हा येईन हे केवळ वाक्य नव्हतं,त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं.. मला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.
लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं. पण, उध्दवजी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं असेही देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले.
यावेळी देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की अब की बार 400 पारच्या घोषणे मागे पंतप्रधानांच्या भावना समजून घेतल्या पाहीजेत. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांनी स्वतःला छत्रपती म्हणून घेतले. परंतू राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक केवळ यासाठी केला की, जगाला कळावं की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ, पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी, हा विश्वास आहे यात अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
शरद पवार यांनी मुलीला पुढे आणले तिला आपला वारसदार जाहीर केले आणि राष्ट्रवादी फुटली. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी केला. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादामुळेच हे सगळे झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सक्षम व्यक्तीला डावलून नातेवाईकांना संधी देणे म्हणजेच परिवाद आहे. कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खरगे स्वत: काही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय राहुल गांधीच घेतात हे लोकांना माहीती आहे. काल गृहमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी का फुटली. कारण पवारांनी पक्ष पुतण्याला नाही तर मुलीला दिला. मला विश्वास आहे की, भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकारणात दिसली तरी स्वतःच्या सामर्थ्यावर आलेल असतील असे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.















Discussion about this post