मुंबई । आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटानं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. वाघेरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी संजोग वाघेरे यांची ओळख आहे. ते पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दोन वेळेस तयारी केली होती, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही.
आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.















Discussion about this post