मुंबई । महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे, पण हिंदुत्वाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे शिंदे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा गौप्यफोट केला.
बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना खरी शिवसेना आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरेंना नको होते, तेच उद्धव ठाकरेंनी स्वीकारले. ठाकरे यांच्याकडून काँग्रेसची भाषा बोलली जात आहे. सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी कथी तडजोड केली नाही. त्यामुळे नकली शिवसेना हे केलेले वक्तव्य खरे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो. भाजपच्या चार-पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची पूर्ण तयारी तेव्हा करण्यात आली होती. भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचा ठाकरे यांचा डाव होता, असा गौप्यफोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.















Discussion about this post