मुंबई । मागील दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप झाले. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांमुळे महायुतीत ठिणगी पडल्याचे बोललं जात आहे. यातच एक वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांसोबत युती करुन चूक झाली असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट विधान केले.
“अजित पवारांना घेऊन चूक झाली असं म्हणणार नाही. काळाची गरज होती. काळाची गरज असताना संधी आली तर कधी सोडायची नसते. सेटल व्हायला वेळ लागतो. सेटल होईल त्याचा फायदा होईल. छोटीशी गोष्ट आहे. उदाहरण म्हणून नाही. अजितदादा सर्व आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. ४० वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांना असं कधी पाहिलं का. गेले ना, त्यांना आमचे काही गुण लागणार ना. काळजी करू नका”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सध्या अनेक राजकीय विधाने केली जात आहेत. एक प्रकारे अशा प्रतिक्रिया देऊन पक्षाला खड्ड्यात घालतो आणि महायुतीला कमजोर करतो. आता लवकरच तीन पक्षाचे तीन अधिकृत प्रवक्ते जाहीर करणार आहोत. ते बोलतील तेच अधिकृत असेल. बाकी काही नसेल. काही मतदारसंघात स्पर्धा असते. काही कार्यकर्त्यांना वाटतं आपण ५०० मतांनी हरलो ती जागा मिळायला पाहिजे. हे बरोबर आहे. पण त्यातून महायुतीला कमी करतोय असं वाटू नये”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.















Discussion about this post