जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची पुन्हा भाजपात घरवापसी होणार असून खुद्द एकनाथ खडसेंनी याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे राज्यातील सत्तेची समीकरणं बदलतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. पण एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांनी साडेतीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या दरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. ते सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. असं असताना त्यांनी आता परत भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. असं असलं तरी भाजपकडून किंवा एकनाथ खडसे यांच्याकडून राज्यपालपदाच्या जाबाबदारी बाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.















Discussion about this post