मुंबई । देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्र राज्यातही लोकसभा निवडणुकांचे चार टप्प पार पडले आहेत. तर पाचवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून प्रचारसंभांचा धडाका सुरु आहे. असं राजकीय वातावरण असताना आता मुंबईतील भाजपते नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले असून त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मोहित कंबोज यांनी एक्स अकाउंटवरुन एक ट्विट केले आहे. कंबोज म्हणाले, “4 जून नंतर उद्धव ठाकरे सेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटणार आहे. शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी एसपीचे उर्वरित आमदार व नेते पक्षाला रामराम करणार आहेत. अनेक आमदार, खासदार, नेते शिवसेना व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा कंबोज यांचा दावा केला आहे. “फिर से खेला होबे” म्हणत कंबोज यांनी पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. आता मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.















Discussion about this post