भुसावळ । कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये भुसावळ पोलिसांनी दोन अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तालीब अली रशीद अली (20, रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) व मोहम्मद अली लियाकत अली (35, रझा टॉवर, पापा नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी हे ऑपरेशन हाती घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) व पोलीस निरीक्षक राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ) यांच्या मार्गदर्शनाखाली ईराणी वस्ती येथे छापा टाकण्यात आला.
या छाप्यात संशयित आरोपी तालीय अली रशीद अली व मोहम्मद अली लियाकत अली या दोघांना घरातूनच ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी तालीब अली विरोधात एमआयडीसी व वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात तो वॉण्टेड आहे तर मोहम्मद अली विरोधात उपनगर पोलिसात दोन, जिल्हापेठ, बाजारपेठ, उमरेड, जि.नागपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे.















Discussion about this post