धुळे । नुकतेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेचा भंडाफोड केल्यानंतर आता पोलिसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. धुळे शहरातील शिरपूर परिसरामधील लॉजवर पोलिसांची छापेमारी केली असून यावेळी ५ जोडपी नको त्या अवस्थेत सापडले
मागील काही दिवसांपासून धुळे शहरासह परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण वाढलं आहे. अगदी काही दिवसापूर्वीच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेचा भंडाफोड केला होता. त्यानंतर शिरपूर शहरातील एका लॉजवर काही अविवाहित जोडपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी संबंधित कॅफेंवर व लॉजवर छापेमारी केली असता, येथून जवळपास पाच जोडपे अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. चौकशीअंती पोलिसांनी समज देऊन त्यांना सोडून दिलं. तसेच यानंतर असे कृत्य करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही दिला.
त्याचबरोबर कॅफे मालक आणि लॉज चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शिरपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कॅफे व लॉजमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या कॉलेजच्या तरुण-तरुणींमध्ये चांगलीच वचक निर्माण झाली आहे.















Discussion about this post