रावेर : तालुक्यातील उटखेडा येथे झन्नामन्ना जुगाराच्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून सुमारे साडेपंधरा हजार रुपयांसह सात मोबाईल व सात दुचाकी असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज रावेर पोलिसांनी जप्त केला. या बाबत नऊ जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उटखेडा शिवारातील नकट्या नाल्याच्या शेजारी पडिक जमिनीवर उघड्यावर झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस कर्मचारी प्रमोद पाटील, समाधान ठाकूर, राहुल परदेशी, महेश मोगरे, अमोल जाधव यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार ५०० रुपये रोख,
एक कॅटचा बॉक्स व पत्त्याचा कॅट, ५ ऍन्ड्राईड व २ साधा बटनाचा असे ४८ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल, दोन लाख ४० हजार रूपयांच्या ७ दुचाकी असे एकूण तीन लाख तीन हजार ५०० रुपयांचा ऐवज जुगार खेळत असलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी जप्त केला.
या बाबत पोलिस कर्मचाऱ्यांनी विशाल पाटील यांनी रावेर पोलिस ठाण्यात राहुल भालेराव (कुसुंबा खुर्द), कादर तडवी (लोहारा), मोसिन तडवी (रावेर), कलिम खाटीक (लोहारा), फिरोज तडवी (लोहारा), विकास पवार (लोहारा), सुलेमा तडवी (लोहारा), मुकेश भालेराव (कुसुंबा खुर्द), काशीनाथ धनगर (सावखेडा), या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे तपास करीत आहेत.















Discussion about this post