नंदुरबार : अवैधपणे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्यांना नंदुरबार पोलिसांनी दणका दिला आहे. नंदुरबार शहरात तीन ठिकाणी व नवापूर येथे एका ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी ३७ सिलेंडर, ७ इलेक्ट्रीक मोटर, ४ वजन काटे असा एकुण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गाझी नगर परिसर, भोणे फाटा परिसर, पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात अवैधपणे गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या भागांमध्ये विना परवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरुन रिफिलींगचा व्यवसाय करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी विनापरवाना गॅस रिफिलींग करित असल्याचे दिसून आले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी याठिकाणी असलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये ३७ सिलेंडर, ७ इलेक्ट्रीक मोटर, ४ वजन काटे असा एकुण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सहा जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गाझी नगर परिसरात अफसरोहीन नवाजोद्दीन काझी (वय २७), भोणे फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी (वय ५०) व पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी (वय ३९), पटेलवाडी परिसरात फयाज सईद कुरेशी (वय १९), दुकान मालक आमीन वाहीद पिंजारी, तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात जुनेद फारुक काथावाला याचेविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
Discussion about this post