जळगाव । नेरी नाका परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २७ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी एक लाख ६७ हजार रुपयांच्या रोकडसह चार दुचाकी जप्त करण्यात आले.
नेरीनाका परिसरात मोठा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ राजेश मेढे, महेश महाजन, किरण चौधरी, श्रीकृष्ण देशमुख, भगवान पाटील, पोकॉ हरिष परदेशी या पथकाने नेरीनाका परिसरात असलेल्या जुगार अड्ड्यावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास छापा टाकला. तेथे असलेल्या एकेकाला ताब्यात घेण्यास सुरूवात केली. एकामागून एक अशा २७ जुगारींना जुगाराच्या खेळातून उचलून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातू
न घोळातील रोख एक लाख ६७ हजार रुपये रोख रक्कम चार दुचाकी व १८ मोबाईल जप्त केले. सर्व जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत अटकेसह कायदेशीर कारवाई सुरु होती.
Discussion about this post