पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविले जात आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.
पीपीएम कोऑर्डिनेटर, वरिष्ठ वैद्यकीय सुपरवायजर, टीबी हेल्थ विजिटर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती https://www.pmc.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
पात्रता काय?
पीपीएम कोऑर्डिनेर पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावेत. याचसोबत हेल्थ प्रोजेक्टसवर १ वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर दासाठी बॅचरल डिग्र प्राप्त केलेी असावी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला असावा. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर असवेत. याचसोबत कामाचा अनुभ असावा.
किती पगार मिळेल?
जिल्हा पीपीएम कोऑर्डिनेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला २०,००० रुपये पगार मिळणार आहे. सिनियर ट्रिटमेंट सुपरवायजर पदासाठीही २०,००० रुपये पगार मिळणार आहे. टीबी हेल्थ विजिटर पदासाठी १५५०० रुपये पगार मिळणार आहे.
पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. जर तुमच्याकडे १-२ वर्षांचा अनुभव असेल तर काम करण्याची उत्तम संधी आहे. हा अनुभव भविष्यात खूप कामाला येईल. पुणे महानगरपालिकेसारख्या चांगल्या विभागात काम करण्याची ही संधी गमवू नका. इच्छुकांनी आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post