नवी दिल्ली । केंद्रात पुन्हा एकदा भाजपाप्रणित एनडीएचे सरकार स्थापन होत असून आज सायंकाळी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांचा शपथ घेणार आहेत. तत्पुर्वी भावी मंत्र्यांची मोदींच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मोदींनी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी शंभर दिवसांचा रोडमॅप उपस्थितांना सांगून त्या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यासोबत पेंडिंग असलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तुम्हाला जो विभाग मिळेल, त्या विभागात लवकरात लवकर काम सुरु करा, अशाही सूचना मोदींनी केल्या.
२०४७ पर्यंत भारताला पूर्ण रितीने विकसित करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांसंदर्भात मोदींनी सूचना केल्या. जनतेला एनडीएवर भरोसा आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन मोदींनी केलं.
बैठकीला ‘या’ नेत्यांची उपस्थिती
पंतप्रधानांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या बैठकीला सर्बानंद सोनोवाल, चिराग पासवान, अन्नपूर्णा देवी, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, भगीरथ चौधरी, किरेन रिजिजू, जितिन प्रसाद, एचडी कुमारस्वामी, ज्योतिरादित्य सिंधिया, निर्मला सिथेहारा यांचा समावेश होता. तसेच अजय टमटा, राव इंद्रजित सिंग, नित्यानंद राय, जीतन राम मांझी, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत, हर्ष मल्होत्रा, एस जयशंकर, सीआर पाटील आणि कृष्णपाल गुर्जर हे खासदारदेखील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील फोन आलेल्या खासदारांची नावे
नितीन गडकरी
पीयूष गोयल
रक्षा खडसे
प्रतापराव जाधव
रामदास आठवले
मुरलीधर मोहोळ















Discussion about this post