केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबविली जात असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. या योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत या योजनेत १८ हप्ते देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला जमा केला जाणार आहे. याबाबत केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे.
पीएम किसान सन्मान निधीचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत आता १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. मात्र,तुम्ही जर केवायसी केले असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन केवायसी करा. तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही केवायसी करु शकतात.
ऑनलाइन पद्धतीने केवायसी कसं करायचं?
तुम्ही सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर होमपेजवर लिहलेल्या ई- केवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर टाका सर्च करा.
यानंतर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.
ज्या शेतकऱ्यांनी तारखेपूर्वी केवायसी केले नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत. शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी, उपकरणे घेण्यासाठी पैसे मिळावेत, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात अशीच एक नमो शेतकरी योजना आहे. ज्यामध्येही शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये मिळतात.
Discussion about this post