नवी दिल्ली । शेतकरी पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 14 व्या हप्ता जारी केले. योजनेअंतर्गत सरकार दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांना 2,000 रुपये देते. पण काही कारणांमुळे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तक्रार कशी करायची याविषयी जाणून घेऊया सविस्तर
1. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, शेतकऱ्यांना (Farmer) अर्ज करावा लागेल आणि ई-केव्हीआयसी करणे अनिवार्य आहे. त्यांचे खाते आधारशी (Aadhar) जोडलेले असावे. ज्या शेतकऱ्यांचे बँक (Bank) खाते आधार कार्डशी लिंक केले जाईल, DBT म्हणजेच आधारशी लिंक केलेल्या खात्यात सक्षम असा पर्याय असेल ज्यामधून ई-केवायसी पूर्ण करता येईल, त्यांना 14 व्या हप्त्याचे पैसे मिळतील.
2. तुमचे पैसे आले नाहीत तर काय करावे?
जर तुम्हाला तुमच्या खात्यात 14 व्या हप्त्याअंतर्गत 2,000 रुपये मिळाले नसतील, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाभार्थीचे नाव यादीच तपासावे लागेल. यासोबत तुम्ही तुमच्या बँक खात्याचे तपशील, आधार क्रमांक आदी माहिती भरलेली कागदपत्रे अगदी बरोबर आहेत हे देखील पहा. कुठेतरी चूक झाली तरी तुमचे पैसे अडकू शकतात.
3. लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?
सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल.
स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला “फार्मर्स कॉर्नर” दिसेल, त्याखाली अनेक बॉक्स असतील. तिथे “लाभार्थी स्थिती” असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.
जर मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर प्रथम नोंदणी करा. यासाठी तुमच्या फोनवर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल.
आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data वर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या खात्याची स्थिती दिसेल.
4. आणखी काय करता येईल?
तुमचा तपशील चुकीचा असल्यास किंवा तुम्हाला आणखी मदत हवी असल्यास, तुम्ही हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर कॉल करू शकता. 011-23381092 या क्रमांकावर मदत घेता येईल. पीएम किसान योजनेअंतर्गत अधिकृत ईमेल आयडी- pmkisan-ict@gov.in देखील चालवला जातो , ज्यावर तुम्ही ईमेल करू शकता.
Discussion about this post