केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. २२वा हप्ता जमा होण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक आणि बँक खात्याची लिंकिंग तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास हप्ता थांबवला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.सरकारने ३० लाख शेतकऱ्यांची नावे सध्या तरी वगळली असल्याची माहिती समोर आले आहे.
अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते-आधार जोडणी पूर्ण न केल्यामुळे त्यांच्या नावांवर टांगती तलवार आहे. गुजरातमधील २.९० लाख शेतकऱ्यांनी अकाउंट लिंक केले नाही. केरळमधील ६८,७९८ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही.महाराष्ट्रातील जवळपास १,७२,३४९ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसानचे २००० रुपये मिळणार नाहीये.
महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आधार-बँक लिंकिंग पूर्ण केले नसल्यामुळे त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडथळे येऊ शकतात. प्रशासनाकडून संबंधितांना तातडीने ऑनलाइन पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Beneficiary Status’ तपासावा आणि ई-केवायसी प्रलंबित असल्यास ती त्वरित पूर्ण करावी, असेही सांगण्यात आले आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास २,००० रुपयांचा हप्ता खात्यात जमा होण्यास अडचण येणार नाही.















Discussion about this post