नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदीचा बातमी आहे. या योजनेचा हप्ता मिळण्याची तारीख ठरली असून त्यानुसार 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत केली जाते. या दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची मदत हस्तांतरीत केली जाते.
यापूर्वी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. पीएम किसान योजनेचा 16 हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला जाणार आहे. या तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली जाणार आहे.
Discussion about this post