सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला २००० रुपये दिले जातात. या योजनेत आता १९वा हप्ता दिला जाणार आहे. आज १९ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपुरमध्ये एका कार्यक्रमात पीएम किसान योजनेची १९ वा हप्ता दिला जाणार आहे. यावेळी ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. जवळपास २२,००० कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. १८ वा हप्ता ९.८ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. १८ ऑक्टोबर रोजी हा हप्ता देण्यात आला होता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत ३.४६ लाख कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतर १९ वी हप्ता दिल्यानंतर ३.६८ रुपये दिले जाणार आहेत.या योजनेत वर्षभरात ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.प्रत्येक हप्त्यांमध्ये २००० रुपये दिले जातात.
पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नाही अशा पद्धतीने करा चेक
सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचं आहे.
त्यानंतर उजव्या बाजूला लिहलेल्या ‘Know Your Status’वर क्लिक करायचं आहे
यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपीवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओटीपी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.
यानंतर ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या हप्त्याच्या स्टेट्स तुम्हाला दिसेल.
फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ
या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी ई-केवायसी केले आहे.तुमचं मोबाईल आणि आधार नंबर जर लिंक असेल तर पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुम्ही ई-केवायसी करु शकतात. याचसोबत तुम्ही जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन फिंगरप्रिंट वेरिफिकेशन करु शकतात.
Discussion about this post