नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. या योजनेंतर्गत 13 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असून आता शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तुम्हीही पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या हप्त्याची रक्कम जूनच्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते.
मोदी सरकारकडून आर्थिक मदत म्हणून देशातील शेतकरी बांधवांना वर्षभरात 6 हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. याअंतर्गत चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात.
आता या योजनेंतर्गत 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हप्त्याची रक्कम जूनच्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते. मात्र, मोदी सरकारकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही अपडेट किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
PM किसान योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या दृष्टिकोनातून, मोदी सरकारकडे पुढील हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत, जून ते जुलै दरम्यान केव्हाही 14 व्या हप्त्यासाठी पैसे पाठवण्याची अटकळ जोरात सुरू आहे.
त्यांना पुढील हप्त्याचा लाभ घेता येणार नाही
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, परंतु आतापर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकला नाही, तर ते करा, अन्यथा तुमच्या 14व्या हप्त्याची रक्कम अडकू शकते. जमीन पडताळणीसाठी तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयात जावे लागेल.
Discussion about this post