जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत बुधवारी वृक्ष दिंडी काढून ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
शासन निर्देशान्वये हा उपक्रम राबविण्यात आला. जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी भवनापासून वृक्ष दिंडीला प्रारंभ झाला. या दिंडीत निर्मल महाजन या विद्यार्थ्याने विठ्ठलाचा पोशाख परिधान केला, आदिवासी जमातीचा व वारकऱ्यांचा पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एन.सी.सी.चे विद्यार्थी देखील सहभागी होते. विठ्ठलाचा गजर करत हि वृक्ष दिंडी क्रीडा संकुलापर्यंत काढण्यात आली. त्या परिसरात ७५ विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयंत लकुरवाळे, कर्नल पवन, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, उद्यान अधिक्षक अश्विनी पाटील, कॅप्टन आर.आर. राजपूत, रा.से.यो.चे विभागीय समन्वयक प्रा. संजय शिंगाणे, नोडल अधिकारी प्रा. दिनेश पाटील, डॉ. मनोज इंगोले, नेहरू युवाकेंद्राचे श्री.डागर, सहा. कुलसचिव वसंत वळवी, कक्षाधिकारी शरद पाटील, कैलास औटी, आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबीर
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी स्वत: शिक्षण घेत असतांना प्रवाहाबाहेरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास ६० जणांनी रक्तदान केले. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस कुलगुरूंच्या हस्ते ज्ञानस्त्रोत केंद्रात पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रक्तदान शिबीर झाले. विद्यापीठ रासायनिक तंत्रज्ञान संस्था आणि आदिवासी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी वसतिगृहातील १५० विद्यार्थी पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. विशाल पराते, डॉ. राजकुमार सिरसाम, प्रा. किशोर पवार, प्रा.जी.ए. उस्मानी, प्रा. पद्माकर चव्हाण, प्रा. अतुल बारेकर, प्रा. आर.बी.आमले, प्रा.के.पी. दांडगे, प्रा.ए.एम. पाटील तसेच चार आदिवासी वसतिगृहाचे गृहपाल यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post