जळगाव : “माझे शहर माझी जबाबदारी अभियाना”अंतर्गत जळगांव शहर महापालिकेचा पर्यावरण विभाग, एस.डी.फाऊंडेशन, आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची ११२वी जयंती आणि डॉक्टर्स डे यांचे औचित्य साधून दि.१जुलै रोजी १०० झाडांचे वृक्षारोपण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रांगणात करण्यात आले.
पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील, एस.डी.फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर दुसाने, मनपा पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास गाजरे डॉक्टर्स डे च्या निमित्ताने एस.डी.फाऊंडेशन आरोग्य विभागाचे डॉ.स्वाती धुमाळ आणि डॉ.देवानंद धुमाळ यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी लावलेल्या सर्व झाडांचे संगोपन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय करणार असून विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रत्येकी एका झाडांचे पालकत्व दिले जाणार आहे.यावेळी फाऊंडेशनचे सचिव सुहास दुसाने, सौ.भाग्यश्री दुसाने, अहिर सुवर्णकार समाज अध्यक्ष संजय विसपुते, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे , डॉ. रमेश कांबळे, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता, प्रा.संतोष ठाकूर, प्रा.सशांक झोपे,प्रा.डॉ. श्रीपाद मोहनी, शैक्षणिक अधिष्ठाता, डॉ. शशिकांत वग्गे, विभागप्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, डॉ. प्रशांत गायधने नवोपक्रम अधिष्ठाता,
डॉ.सोनपिंपळे,प्रा.व्ही.टी.पाटील,डॉ.एस.सी.कुलकर्णी, डॉ.विद्या सराफ, डॉ.जी.एम.माळवटकर, डॉ.एस.एम.पाटील, डॉ.स्वप्ना पाटील, डॉ.मगला धोत्रे, डॉ.डोंगरदिवे, प्रा.अंसारी, प्रा.सुर्यवंशी, प्रा. गोसावी, प्रा. गडहिरे, प्रा. साळी. विलास पाटील, विभागप्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी श्रीमती कल्पना रमेश सरोदे, विभागप्रमुख, संगणक अभियांत्रिकी मिशन ग्रीनरचे अजिंक्य तोतला,यासह फाऊंडेशनचे प्रा.विशाल पाटील,जतीन इंगळे,चेतन जाधव, उपस्थित होते.
Discussion about this post