नवी दिल्ली । गेल्या काही दिवसापूर्वी अहमदाबाद येथे एअर इंडियाच विमान कोसळून 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या भागातून विमान अपघाताच्या बातम्या सतत सुरुच आहेत. अशातच आणखी एका विमान दुर्घटनेची बातमी समोर आलीय.
आता रशियामध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. रशियाच्या अमूर भागात ४९ प्रवाशी असलेलं अंगारा एअरलाइन्सच एक विमान कोसळलं. या दुर्घटनेत ४९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. काही तासांपूर्वी हे विमान रडारवरुन गायब झालं होतं.
तास या वृत्तसंस्थेनुसार एन-24 कोडने संचलित होणाऱ्या या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी होते. 6 चालक दलाचे सदस्य सुद्धा विमानात होते.
अंगारा एअरलाइन्सच हे विमान AN-24 मध्ये दोन महिन्यांपूर्वी रनवेवर आग लागली होती. विमान किरेन्स्कमध्ये लँड करत असताना त्याचं नाक तुटलं होतं. त्यामुळे विमानात आग भडकलेली. त्यावेळी कोणती जिवीतहानी झाली नव्हती. जुलै 2023 मध्येच AN-24 सीरीजच एक विमान कोसळलं होतं. विमानात त्यावेळी 37 प्रवासी होते.
Discussion about this post