जळगाव । जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सुपडू बंडू तडवी (वय-४२, रा. चिलगाव ता. जामनेर), योगेश भरत राजपूत (वय-२९ रा. जामनेर), शेख शाहरुख शेख हसन (वय-२६, रा. इमामवाडा, रावेर) व योगेश देविदास तायडे (वय-३३, रा. महेश नगर, भुसावळ) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.
चौघांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. चौघांविरुद्ध प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी आलेल्या चारही प्रस्तावांचे अवलोकन करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे रवाना केला.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी स्थानबद्धतेच्या कारवाईच्या प्रस्तावाला मंजूर देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हेगार योगेश भरत राजपूत याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात, सुपडू बंडू तडवी याला अमरावती कारागृहात, शेख शाहरुख शेख हसन याला कोल्हापूर कारागृहात आणि गुन्हेगार योगेश देविदास तायडे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे, अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.















Discussion about this post