पुणे । पुण्यात गेल्या काही दिवसांपासून ड्र्ग्जचे मोठ्या प्रमाणात साठे सापडले आहेत. अशातच पुण्यातील तरुणाई या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे. अशातच मराठी अभिनेत्याने याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आणला आहे.
मराठी चित्रपट अभिनेता मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांनी एक व्हिडिओ लाइव्ह करून नशेच्या धुंदीत असलेल्या दोन मुलीची अवस्था समोर आणली आहे. हा प्रकार पुण्यातील वेताळ टेकडीवरील आहे. त्यामुळे राज्यात नव्हे तर देशभरात जात ड्रग्सची कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांच्या मशाली खालीच अंधार असल्याची चर्चा आता सगळीकडे होऊ लागली आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये
या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स घेऊन नशेत बडबड करताना दिसत आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला आहे. ते म्हणतात, आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. तर येथे महाविद्यालयात असणाऱ्या पहिल्या वर्षातील दोन तरुणी बिअर, दारु आणि नशेचे काहीतरी घेऊन कोपऱ्यात पडल्या होत्या. काही तरुणांनी त्यांना उचलून आणले. आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. परंतु एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? असा रोखठोक प्रश्न रमेश परदेशी यांनी विचारला आहे.
Discussion about this post