मुंबई । महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन करत फुले सिनेमा जसा आहे तसा दाखवला नाही, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सिनेमाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाली आहे.
महात्मा फुले यांच्या कार्याच्या बाबत असलेले फुले सिनेमातील काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत. शासनाला आम्ही सांगतो की महात्मा फुले यांचे वांगमय प्रकाशित करण्यात आले आहेत. शासनाशी आम्ही सहमत नसल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सेन्सॅार बोर्डाचा निषेध नोंदविला. ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे ते म्हणाले. पुण्यातील फुले वाड्याच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निषेध नोंदविला.
Discussion about this post