जळगाव । सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून उमेदवाराच्या प्रचारास वेग आला आहे. प्रचाराचे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशातच मात्र जळगावात महायुतीच्या बॅनरवर सध्या राजकारणातून अलिप्त असलेले सुरेशदादा जैन यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मात्र यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सुरेश जैन यांच्या परवानगीशिवाय भाजपकडून फोटो वापरला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
राज्यातील राजकारणात चर्चेचे राहिलेले जळगावातील सुरेशदादा घरकूल प्रकरणानंतर राजकारणातून अलिप्त झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कोणत्याही राजकीय पक्षासोबत गेले नाही. मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही गेले नाही. परंतु आता भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मेळाव्यातील बॅनरवर सुरेश जैन यांचा फोटो वापरला गेला आहे.
त्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. ज्याच्याकडे स्वतःचं काही नसतं ते स्वतःचा अस्तित्व टिकवण्यासाठी असेच धंदे करू शकतो, संकट मोचक संकटात सापडल्यामुळे त्यांना अशी सर्व धंदे करावे लागत आहे, असा आरोप त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केला.
Discussion about this post