नवी दिल्ली । केंद्र सरकारने इंधनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १ एप्रिलपासून केवळ २० टक्के इथेनॉल मिश्रीत आणि 95 IRON पेट्रोल विकणे बंधनकारक असणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी स्पष्ट केलं आहे की, पेट्रोलियम कंपन्यांनी भारतीय मानक ब्युरोच्या मानकांनुसार, २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्री करावी लागणार आहे. त्यात RON 95 असेल. यामुळे देशभरातील पेट्रोलची गुणवत्ता एकसारखी होणार आहे.
सरकारने स्पष्ट केलं आहे की, काही विशिष्ट ठिकाणी सूट देण्यात आली आहे. इथेनॉल हे ऊस, मका या पिकांपासून बनवले जाते. इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल. यामुळे वाहनाचं उत्सर्जन देखील कमी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३-२५ साली तयार झालेलं वाहन E20 म्हणजे इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या अनुषंगाने गाड्या तयार करण्यात आल्या होत्या. या पेट्रोलमुळे नव्या वाहनांना कोणतीही मोठी समस्या होणार नाही.परंतु जुन्या वाहनांचं ३ ते ७ टक्क्यांपर्यंत मायलेज कमी होईल.
95 RON इंजिनच्या सुरक्षेसाठी फायदेशीर
इंजिनचे नुकसान टाळण्यासाठी 95 RONच्या वापरावर भर दिला जात आहे. इंजिनमध्ये इंधन जळते, त्यावेळी ‘नॉकिंग’ होते. परंतु पिंगिंग सारखा आवाज येतो, त्यावेळी सर्वात जास्त इंजिनचं नुकसान होतं. त्यामुळे RON फायदेशीर ठरते. परंतु पेट्रोलच्या दराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.















Discussion about this post