Wednesday, February 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोलपंपावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोलपंपावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाकडूनच 1 कोटी 33 लाख 752 रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आला. याप्रकरणी अपहार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्‍हा पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ या उपनिरीक्षकाकडे सोपविण्यात आली होती. पेट्रोल, डिझेल विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम त्याने स्टेट बँकेच्या संबंधित खात्यात नियमित जमा करणे आणि त्याचे अचूक जमाखर्चाची नोंद ठेवण्याची त्याची जबाबदारी होती. मात्र, ७ एप्रिल २०२५ पासून ते गुन्हा दाखल होईस्तोवर दहा महिन्याच्या कार्यकाळात त्याने हिशेबात हेरफेरी करून तब्बल १ कोटी ३३ लाख ७७२ रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.

वाघ यांचा मुलगा शेखर वाघ याने १२ फेब्रुवारीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन वडील कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. तसेच त्यांनी पेट्रोलपंपाच्या हिशेबात मोठी गडबड झाली असून, मी त्यात पूर्णपणे अडकलो असल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी तत्काळ पेट्रोलपंपावरील व्यवहारांची खात्री करण्याचे आदेश मानवसंसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना दिले. तपासणीवेळी पेट्रोलपंपाच्या तिजोरीत केवळ १ लाख ९६ हजार २१९ रुपये आढळले. मात्र बँकेत भरणा केल्याचे पावती पुस्तक व इतर दस्ताऐवज तेथे नव्हते. त्यामुळे पंपाचे लेखापरीक्षण करण्याचेही आदेश देण्यात आले.

लेखापाल एस. आर. पलोड यांनी १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीचे लेखापरीक्षण केले असता एकूण ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची रोख विक्री झाली व त्यापैकी ३ कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपये बँकेत प्रत्यक्ष जमा केले. मात्र उर्वरित १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.

गुन्हा दाखल
या प्रकरणी प्रभारी संदीप पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत. वाघ हे सध्या पसार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रियादेखील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अपहार करणारा पोलीस उपनिरीक्षक सात दिवसांपासून बेपत्ता असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपहार केल्याबद्दल भीती वाटल्याने पोलीस निरीक्षकाने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुंबई महापालिकेत तब्बल ५७ हजार पदे रिक्त ; लवकरच होणार भरतीप्रक्रिया

Next Post

नागरिकांनो सावधान! जळगावसह राज्यातील हवामानात मोठा बदल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

नागरिकांनो सावधान! जळगावसह राज्यातील हवामानात मोठा बदल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

राष्ट्रीय साखर संस्थेत भरती; बारावी उत्तीर्णांना संधी, ८१,१०० रुपयांपर्यंत पगार मिळणार

February 18, 2026
मोठी बातमी: राज ठाकरे भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ!

मोठी बातमी: राज ठाकरे भेटीसाठी एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ!

February 18, 2026
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

नागरिकांनो सावधान! जळगावसह राज्यातील हवामानात मोठा बदल

February 18, 2026
जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोलपंपावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

जळगाव पोलीस दलाच्या पेट्रोलपंपावर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

February 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page