मागील काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र अद्यापही पेट्रोलचा दर शंभर रुपयावर आहे. यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत असून मात्र आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात आता लवकरच पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने कदाचित पेट्रोल डिझेलच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे.
सध्या इतर देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमत या ७० डॉलर प्रति बॅरलवर विकल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमत ६६ डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. तज्ञांच्या मते, इतर देशातही लवकरच तेल ६५ डॉलरवर व्यव्हार करु शकात. यामुळे भारताला दिलासा मिळणार आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा क्रूड ऑइल आयात करणारा देश आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यावर आपोआप देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात.
दरम्यान, आखाती देशांचा समूह ओपेकने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवला आहे. त्यामुळेदेखील कच्च्या तेलाच्या किंमती कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने कॅनडा, मेकिस्के आणि चीन या देशांवर शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे टेन्शन वाढले होते. मात्र,आता कदाचित कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊ शकतात.
Discussion about this post