नवी दिल्ली : गेल्या वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल आणि डिझेलचा दर बदलला नाहीय. सध्या जागतिक बाजारात कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली असली तरी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहे. आता तीन दिवसांत कच्चा तेलाने आगेकूच केली असून किंमती 80 डॉलरच्या पुढे सरकल्या नाहीत. पण या किंमतींनी पुढचा टप्पा गाठला तर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारतात या राज्यात रात्रीतूनच डिझेलचा भाव 3 रुपयांनी वधारला. या राज्याने अधिभार वाढवला आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Today) महागले का? आजचा किती आहे भाव..
आस्मानी, सुलतानी संकट हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. संपूर्ण राज्य जलमय झाले आहे. पर्यटन स्थळांना मोठा फटका बसला आहे. हे संकट कमी म्हणून की काय, हिमाचल प्रदेश सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धीत करात 3 रुपयांची दरवाढ केली आहे. यापूर्वी सुद्धा डिझेल तीन रुपयांनी महागले होते. आता डिझेलवर 10 रुपये 40 पैशांचा वॅट लागेल. पूर्वी वॅट 7 रुपये 40 पैसे होता.
कंपन्या मालामाल भारतीय तेल कंपन्या गेल्या वर्षभरापासून फायद्यात आहेत. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.