मुंबई : जागतिक बाजारात बुधवारी कच्चा तेलाच्या दरात किंचित घसरण झाली. कच्चा तेलाचे भाव खाली येताच तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले.
भारतात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे भाव जारी केले जातात.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, गुरुग्रामध्ये पेट्रोल 16 पैशांनी, तर डिझेल 15 पैशांनी स्वस्त झाले आहेत. जयपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रतिलिटर 29 पैशांनी, तर डिझेलचा भाव प्रतिलीटर 26 पैशांनी घसरला आहे. याशिवाय गुजरातमधील अहमदाबादमध्ये पेट्रोल 47 पैसे, तर डिझेल 49 पैशांनी स्वस्त झाले आहे.
उत्तरप्रदेशातील नोएडा शहरात पेट्रोल 33 पैशांनी महागलं असून डिझेलच्या भावात सुद्धा 32 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. याशिवाय आग्रा येथे पेट्रोलचा भाव प्रतिलीटर 41 पैशांनी महागला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. मुंबईत पेट्रोलचे दर जैसे थे आहेत.
देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
नवी दिल्ली – पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.७४ रुपये प्रति लिटर, डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
इंधनाचे दर कसे चेक कराल?
देशातील विविध शहरे आणि राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सोयीसाठी सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांना इंधनाचे दर चेक करण्यासाठी SMS सुविधा उपलब्ध करून दिली आहे. BPCL ग्राहक इंधनाचा भाव जाणून घेण्यासाठी 9223112222 वर <डीलर कोड> पाठवू शकतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांसाठी, RSP <डीलर कोड> 9224992249 या क्रमांकवर मॅसेज पाठवू शकता.
Discussion about this post