मुंबई : बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेविरुधात उद्या २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखली केली आहे.
महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश द्या, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर महाविकास आघाडी हा बंद पुकारत असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून कुणालाही महाराष्ट्र बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा दावाही या याचिकेतून करण्यात आलाय.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत इतरांनी देखील महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र बंद करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी कोर्टात तशी बाजूही मांडली आहे. दरम्यान, याबाबत कायदा स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? तुमची भूमिका स्पष्ट आहे तर यात कोर्टाला का खेचताय? असा सवालही हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय.















Discussion about this post