जळगाव |- मातंग समाजातील तत्सम १२ पोट जातीतील ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे. त्यांनी १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
अर्जासोबत शेतीचा सातबारा (७/१२), जातीचा दाखला, आधारकार्ड व पासपोर्ट फोटो जोडावा. महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या मातंग समाजातील व्यक्तींनी अर्ज सादर करावा. असे आवाहन श्री.कसबे यांनी केले आहे.
जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, महाबळरोड, मायादेवी नगर स्टॉप समोर, हातनूर कॉलनी, जळगाव फोन नंबर ०२५७ – २२६३२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री.कसबे यांनी केले आहे.
Discussion about this post