पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक या पदांच्या भरती निघाली आहे.यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 327 जागा यावेळी भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
भरले जाणारे पद आणि आवश्यक पात्रता –
1. सहाय्यक शिक्षक- 189 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी. – डी.एड
2. पदवीधर शिक्षक – 138 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय),
एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)
अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 01 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड, पुणे
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
Discussion about this post