पारोळा । पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील रहिवासी शोभा रघुनाथ कोळी (वय ४८) या महिलेची हत्या करून मृतदेह काटेरी झुडपात फेकून देण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून सोन्याच्या दागिन्यांसाठी सदर महिलेची हत्या करण्यात आल्याची कबुली सदर संशयिताने दिली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अनिल गोविंदा संदानशिव (वय ४५) असं पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान डोक्यावर व तोंडावर दगडाने वार करून गळा आवळून जीवे ठार मारत शोभा कोळी यांचा चेहरा प्लास्टिक गोणीत झाकून झुडपामध्ये टाकण्यात आला होता. घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली होती.
या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने महिलेच्या मोबाईलच्या सीडीआरवरून सुमठाणे येथील संशयित अनिल संदानशिव हा शोभा कोळी सोबत असल्याची माहिती मिळाली. पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गावात अनिलचा शोध घेतला असता तो फरार झाला होता. मात्र २८ जूनला रात्री दहाला धुळे जिल्ह्यातून त्यास ताब्यात घेतले.
दागिन्यांसाठी केली हत्या
दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता अनिल याने खून केल्याची कबुली दिली. तर शोभा पारोळा शहरात धुणीभांडी करून तिने सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र, संशयित अनिलने गैरफायदा घेत महिलेशी ओळखी करीत तिला विश्वासात घेतले. सुमठाणे गावाजवळील वन विभागाच्या राखीव जंगलात नेऊन या दागिन्यांसाठी अनिलने तिचा खून केल्याची कबुली दिली.















Discussion about this post