पारोळा । पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात ओमनी कारसह इतर सिलेंडर जळून खाक झाले आहे. पारोळा एरंडोल येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर रात्री नियंत्रण मिळवले.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जिल्हा प्रशासन अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अवैध भरणा केंद्रांचा उत आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आयजी बी जी शेखर यांच्या पथकाने पारोळा तालुक्यातील म्हसवे गावात रेड टाकून अवैध गॅस भरणा केंद्र व सिलेंडर जप्त केले होते.
दि. 19 रोजी रात्री पारोळा तालुक्यातील म्हसवे गावात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या स्टेशनवर गॅस भरण्यासाठी आलेल्या मारुती ओमनी मध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. यात दुकानात असलेले तीन ते चार सिलेंडर देखील फुटले व गॅस भरण्यात येणाऱ्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या. हा स्फोट इतका भीषण होता की एक ते दीड किलोमीटर दुरून आगीचे लोड दिसत होते.
Discussion about this post