पारोळा । पारोळ्यात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मोठी कारवाई केली. यात शेतातील सागाची झाडे तोडण्यासाठी आठ हजार रूपयांची स्वीकारताना पारोळा वन विभागाच्या दोघा वनपालांना रंगेहात अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली
दिलीप भाईदास पाटील (वय ५२, मोंढाळे, ता. पारोळा रा. देवपूर धुळे) व वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३८, चोरवड, ता. पारोळा) अशी दोघा लाचखोर वनपालांची नावे आहेत.तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा झालेला होता. त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते. त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी वनपाल दिलीप पाटील यांनी तक्रार यांच्याकडे आठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. याबाबत जळगाव एसीबीला १९ जून रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
त्या प्रमाणे पडताळणी केली असता दिलीप पाटील यांनी लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार २ रोजी सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून वनपाल दिलीप पाटील यांच्या सांगण्यावरून वनपाल वैशाली गायकवाड पंचा समक्ष ८ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात कारवाई झाली.
Discussion about this post