बीड । एकीकडे राज्यात बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील इतरही अनेक गुन्हे या काळात समोर आले. अशात परळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले यात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झालाय. या भीषण अपघातात त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झालाय. परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री हा अपघात झाला.
परळीत सरपंचाचा भीषण अपघात, जागीच मृत्यू
सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर परळीत हा भीषण अपघात घडला. आता या अपघाताने पुन्हा खळबळ उडाली आहे.
अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर परळीतील राखेचे अर्थकारण पुन्हा चर्चेत आले आहे. कारण, यामुळे परिसरातील 8 ते 9 गावांना प्रदूषणाचा फटका बसला आहे. याविरोधात काही सरपंचांनी विरोधही केला होता. अशात हा अपघात घडल्याने याबाबतही आता वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत.















Discussion about this post