बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन समर्थकांना संबोधित केले. यावेळी पंकजा मुंडे यांच्या संयमाचा बांध आज फुटला असून त्यांनी आज धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी आपण भापन नेते अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
“माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनो, मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला बोलवेल आणि तुमच्यासमोर भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालणारे खांदे अजून मला मिळालेले नाही. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी मोठी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना विसावू देणार नाही”, असं पंकजा म्हणाल्या.
..त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर’?
“पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिकांशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोकं निवडणुका हरले, पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात कदाचित 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. कारण माझ्या मनात दाट विश्वास आहे”, असं पंकजा म्हणाल्या.
Discussion about this post