मुंबई । मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे निराश असून त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची सुध्दा चर्चा सुरु आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे.
मी भाजप सोडून कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत, मला पराभव पत्करावा लागला आहे. मी ईश्वर साक्ष आज शपथ घेते की, मी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटलेले नाही. मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही.” असंही त्यांनी सांगितलं.
मी याच्याआगोदर सुध्दा म्हणाले होते की, राजकारणात जर चुकीची गोष्ट करावी लागली, तर मी राजकारण सोडेन. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहे. काँग्रेसचे नेते सुध्दा म्हणत आहेत की, पंकजा मुंडे आल्या तर येऊ द्या, हे सगळं कोण पसरवत आहे ?’ या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं.
सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंबईतील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
Discussion about this post