मुंबई । भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवणे आणि त्यांना त्रासदायक कॉल केल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपी अमोल काळे (वय 25, रा. पुणे, मूळ गाव – परळी, बीड) याला पोलिसांनी पुण्यातील भोसरी येथून अटक केली आहे. आरोपी विद्यार्थीदशेतला असून पंकजा मुंडे यांना अश्लील मेजेस करण्यामागे त्याचा काय हेतू आहे, याचा पोलिस तपास करत आहे.
भाजपचे सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (वय-26) यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सायबर पोलिस विभागात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आरोपीचे लोकेशन ट्रेस करून सायबर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल काळे गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार फोन करत होता. त्यांना अश्लील व त्रासदायक मेसेज पाठवत होता. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या भाजपचे सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे (वय 26) यांनी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील सायबर पोलिस विभागात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर तपासाची चक्रे फिरवताना पोलिसांनी संबंधित मोबाईल नंबर ट्रेस करून आरोपीचा लोकेशन पुण्यातील भोसरीमध्ये असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमोल काळेला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीतच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 78, 79 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.
Discussion about this post