पालघर : राज्यातील सर्व जागांवरील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून राज्यातील पालघर लोकसभा मतदारसंघात मतदारांना ५०० रूपये देतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओचा आधार घेत विरोधकांनी मतदारसंघात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड विधानसभेत मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पैसे वाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारांना पैसे देऊन कमळाला मतं देण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. त्यानंतर पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजपने विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे.
तीन नंबरचं बटण आहे… कमळचं… त्याला तुम्हाला मत द्यायचं आहे. कोणी काही बोललं तरी कमळलाच मत द्यायचं…. यादीत नाव नसले तर सांगा… या व्हायरल व्हिडीओमध्ये कोणीतरी मतदाराला सांगताना दिसतोय. तर झालेल्या प्रकारासंबंधित निवडणूक आयोग कारवाई करणार का? असा सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
Discussion about this post